लग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवविवाहित वधू लग्नानंतर 20 तासातच सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या अलवर येथे ही घटना घडली आहे. सासरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. सासरचे लोक आणि पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. तरुणाने विवाहसंस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये राहणाऱ्या या मुलीशी लग्न केलं होतं.  मिळालेल्या माहितीनुसार, एनईबी ठाणे क्षेत्रातील रणजीत नगर येथे राहणाऱ्या राजकुमार शर्मा यांनी आपला मुलगा हेमंतच्या लग्नासाठी जयपूरमधील एका विवाहमंडळाशी संपर्क साधला होता. त्यांच्या सांगण्यानुसार जयपूरच्या जैन मंदिर गलता गेटसमोर सुरक्षारक्षकाची नोकरी कऱणाऱ्या…

Read More