‘माझ्या मुलाचा पराभव व्हायला हवा,’ काँग्रेस नेत्याचं जाहीर विधान, म्हणाला ‘भाजपात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना काँग्रेस नेते आणि आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटनी यांनी मोठं विधान केलं आहे. ए के अँटनी यांनी आपल्या मुलाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला पाहिजे असं म्हटलं आहे. अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला असून, केरळमधून निवडणूक लढत आहेत. इंडिया आघाडी पुढे जात असून, भाजपा आता खाली जात आहे. आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी आहे. आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात सतत लढत आहे असं ए के अँटनी म्हणाले आहेत. …

Read More

‘मोदी-शाहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश..’; ठाकरे गटाचा टोला! चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP: कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2 दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. गुरुवारी गंगोपाध्याय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तृणमूल काँग्रेसविरोधात भाष्य केलं. “भ्रष्टाचारी तृणूल काँग्रेस पक्षाची राज्यातून हकालपट्टी करणे हेच आमचे ध्येय आहे,” असं गंगोपाध्याय म्हणाले आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन अशाप्रकारे न्याय व्यवस्थेमधील व्यक्तीने राजकीय भूमिका घेणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला आहे. भाजपची एजंटगिरी “मोदी काळ हा राष्ट्र, संविधान, लोकशाहीसाठी अशुभ काळ आहे. सर्व घटनात्मक संस्थांवर भाजपने ‘आपली’…

Read More

तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tech News : दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर आता इतका सर्रास झाला आहे, की हल्ली अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच मोबाईल (Mobile) हीसुद्धा अनेकांचीच मूलभूत गरज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा रस्त्यानं चालताना, एखाद्या ठिकाणी प्रवास करताना किंवा मग अगदी काहीही न करता घरात बसलेलं असतानाही बरीच मंडळी शांत बसलेली दिसत नाही. साधारण वयोवृद्ध पिढी वगळली तर, उरलेल्या प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन दिसतो.  कित्येकदा तर, काहीही कारण नसतानाही या स्मार्टफोनमध्ये डोकावलं जातं. उगाचच काहीतरी पाहावं म्हणून पाहिलं जातं, सोशल मीडियावर व्यर्थ Scroll केलं जातं.…

Read More

‘मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते करा,’ विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपण वाहन चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना अनेक चालक सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. अशाप्रकारे ते फक्त आपलाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. दरम्यान आपण नियमांचं उल्लंघन केलेलं असतानाही हे चालक पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालत असतात. अशावेळी अनेकदा त्यांच्याकडून पोलिसांना अपशब्द वापरत, मारहाणही केली जाते. पण असं करत आपण कायद्याच्या कचाट्यात अडकून आपल्या नावे गुन्हा दाखल होऊ शकतो याची अनेकांना कल्पना नसते. दरम्यान बंगळुरुत असाच एक प्रकार घडला असून, दुचाकी चालकाने विनाहेल्मेट पकडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाचा चावा घेतला आहे. या घटनेचा व्हिडीओ…

Read More

Video : चिमुकल्याला 700 रुपयात हवी होती थार, पण आनंद महिंद्रा यांनी दिलं त्याहून मोठं 'सरप्राईझ'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahindra Thar Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकताच चिकू नावाच्या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चिकू नावाच्या मुलाने 700 रुपयात थार मिळेल का? असा सवाल विचारला होता.

Read More

50 वर्षांसाठी हवं तेवढं बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या मोदी सरकारच्या नव्या योजनेविषयी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Interim Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. शिक्षण क्षेत्रात अर्थसंकल्पातून नवीन कोणत्या घोषणा होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं होतं. अशातच गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक मोठे बदल झाल्याचे अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितले. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याचेही निर्मला सीतारमन म्हणाल्या. यासोबत सीतारमन यांनी 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा केली आहे, ज्याद्वारे 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल. आणखी वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना स्किल इंडिया मिशनअंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच,…

Read More

‘राज साहेबांचा हात खांद्यावर पडला अन्…’; ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराचे ठाकरेंकडून कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Thackeray Appreciate Tushar Deval : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक राजकीय नेत्यांपासून कलाकार मंडळीही त्यांचे चाहते आहेत. अनेक कलाकार हे त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. अशातच मराठी सिनेसृष्टीतील एका कलाकार जोडप्याला राज ठाकरेंनी कौतुकाची थाप दिली आहे. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्या कलाकाराने स्वत: पोस्ट करत याबद्दल भावना व्यक्त केल्या.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बोरीवलीत भव्य मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या मिसळ महोत्सवाला आज राज ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील…

Read More

किती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Government Survey: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे. 

Read More

‘मला 700 रुपयांत थार कार हवी आहे’, मुलाच्या मागणीवर आनंद महिंद्रांनी दिलं उत्तर, म्हणाले ‘तुला…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावरुन ते काही व्हिडीओ शेअर करत, तसंच नेटकऱ्यांना उत्तर देत त्यांचं मनोरंजन करत असतात. आनंद महिंद्रा अनेकांसाठी आदर्श असल्याने त्यांच्या या पोस्ट व्हायरलही होत असतात. यामुळेच एक्सच्या माध्यमातून अनेकजण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका चिमुरड्याच्या व्हिडीओने आनंद महिंद्रा यांचं लक्ष वेधून घेतलं. यावर त्यांनी दिलेल्या उत्तराचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.  व्हायरल झालेल्या या गोड व्हिडीओत चिमुरडा आपल्या वडिलांना फक्त 700 रुपयांत थार कार खरेदी करु शकतो असं सांगताना दिसत आहे.…

Read More

भारताच्या शत्रूंची एकामागून एक पाकिस्तानात हत्या; परराष्ट्र मंत्रालय म्हणालं, ‘न्याय हवा असेल तर…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pak Terrorist : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना एक एक करुन संपवलं जात आहे. अज्ञात बंदूकधारी पाकिस्तानपासून कॅनडापर्यंत भारताच्या शत्रूंना मारत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या अज्ञात हल्लेखोरांविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हल्लेखोरांचे लक्ष्य हे भारत सरकारला हवे असलेल्या दहशतवादी आहेत. पण आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्यांदाच या हत्यांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक भारतीय अधिकाऱ्यांना हवे आहेत त्यांनी येथे येऊन कायद्याला सामोरे जावे, असे गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम…

Read More