विभीषण सांगवीकर यांच्या हस्ते समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के यांचा जाहीर सत्कार


वाळुंज : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष विभीषण सांगवीकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन नवनिर्वाचित सभापती बालाजी सोनटक्के यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
बालाजी सोनटक्के हे छत्रपती संभाजी नगर मधील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडून आले होते. यानंतर विविध विषय समितीच्या निवडीमध्ये त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद च्या समाज कल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली. बालाजी सोनटक्के एक अभ्यासू व उच्चशिक्षित असून त्यांच्या ह्या निवडीमुळे नक्कीच ते विविध समाजांना आपल्या कार्याच्या व पदाच्या मार्फत न्याय मिळवून देतील असे वाटते. त्यांच्या या निवडीबद्दल साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्रकाचे संपादक दत्तात्रय कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *