परीक्षा पेपरफुटीवर विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी ….

*परीक्षा पेपरफुटीवर विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी*  *राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन*

(pragatbharat.com)परीक्षा पेपरफुटीच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणारा परिणाम आणि शिक्षण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर निर्माण होणारे प्रश्न यावर विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. यासाठी

संयुक्त महाराष्ट्र पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने ‘परीक्षा पेपरफुटी : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ की शिक्षण व्यवस्थेचे अपयश? या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत पत्रकारिता व महाविद्यालयीन विद्यार्थी वयोगट 18 ते 25 वर्षे, तर खुला गट 26 ते 35 वर्षे असा सहभाग ठेवण्यात आला आहे. स्पर्धकांनी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत 1,500 ते 2,000 शब्दांचा निबंध सादर करायचा आहे.

विशेष म्हणजे स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ₹11,000, द्वितीय क्रमांकासाठी ₹7,000 आणि तृतीय क्रमांकासाठी ₹5,000 अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मात्र निबंधामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) किंवा अन्य कोणत्याही कॉपी केलेल्या मजकुराचा वापर आढळल्यास तो निबंध ग्राह्य धरला जाणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. 

निबंध पाठविण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2026 असून निबंध WhatsApp क्रमांकावर PDF स्वरूपात पाठवायचा आहे. त्यासोबत स्पर्धकाचे नाव, वय, महाविद्यालयीन ओळखपत्र किंवा आवश्यक माहिती, संपर्क क्रमांक आणि पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याचा निबंध त्यांच्या छायाचित्रासह लोकप्रिय दैनिके आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्ध केला जाणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे. स्पर्धेचा अंतिम निर्णय आयोजकांचा राहणार आहे.

या राज्यस्तरीय उपक्रमाचे निमंत्रक श्री. गोविंद अशोकराव वाकडे, प्रदेशाध्यक्ष – संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई आहेत.

अधिक माहितीसाठी आणि निबंध पाठविण्यासाठी आयोजकांनी खालील संपर्क क्रमांक दिले असून 

स्पर्धकांनी कोणत्याही एका क्रमांकावर मुदतपूर्व आपले निबंध पाठविण्याचे आवाहन करण्यात आलं आहे 

संपर्क क्रमांक-गोविंद वाकडे – 99238 46827 अश्विनी सावंत-डोके – 9881191363 मोहिनी कांबळे – 9284617081

अमृता ओंबळे – 94040 04026 पुष्पा कराडे – 96358 36356 ॲड. गणेश गायकवाड-पाटील – 98504 58913

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *