पुणे:-(pragatbharat.com)राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘अनेक देशांनी महात्मा गांधींच्या विचारांना मानले आहे. पण काही प्रवृत्तींकडून गांधींच्या मृत्यूनंतरही गांधींना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधींनी मानवता, समता आणि नैतिकता या तीन मूलभूत मूल्यांवर भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. शांततेच्या मार्गाने जनशक्तीचे दर्शन जगाला घडवून दिले. शेवटच्या माणसांचा प्रथम विचार गांधींनी केला. आज विविध मार्गांनी महात्मा गांधी यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, ही मोठी खंत आहे. भारताचे सर्वोच्च नेतेही परदेशात गेल्यावर महात्मा गांधी यांचे नाव घेऊन त्यांच्या पुतळ्याला वंदन करतात, मात्र काही अंधभक्त गांधींच्या विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
साधी राहणी, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाला कठीण परिस्थितीत धैर्याने नेतृत्व दिले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात त्यांनी देशवासीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी दिलेला “जय जवान, जय किसान” हा संदेश भारताच्या सुरक्षेसोबतच अन्ननिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. जवान देशाचे रक्षण करतो, तर शेतकरी देशाचे पोट भरतो, हा व्यापक संदेश या घोषणेतून मिळतो.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातून आपल्याला प्रामाणिकपणा, शिस्त, साधेपणा, कर्तव्यभावना आणि देशसेवा यांचे महत्त्व शिकायला मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ पुष्पहार अर्पण करून थांबणे योग्य नाही; त्यांच्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.’’
यावेळी काँग्रेस विचार विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण डावर, प्रदेश खजिनदार ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, उपाध्यक्ष कैलास गायकवाड, बाळासाहेब मारणे, नीता रजपूत, वैशाली धिमधिमे, डॉ. स्नेहल पाडळे, सीमा सावंत, अनुसया गायकवाड, ऋग्वेदिता सपकाळ, कोमल धिमधिमे, आबा जगताप, लतेंद्र भिंगारे, कृष्णा सोनकांबळे, अण्णा गोसावी, ॲड. बाळासाहेब बाणखेले, दिलीप लोळगे, मनिषा फाटे, राजेंद्र पेशने, हरिदास अडसूळ, विजय तिकोणे, शाबिर तांबोळी, खलील सय्यद, बाबासाहेब पाटील, शंकर वडणे, सुदर्शन खरात, योगेश भोकरे, मदन कोठुळे, आशुतोष पवार, मारूती माने, सागर धावडे, संतोष जोशी, अमित कांबळे, दिपक ओव्हाळ, नरसिंह आंदोली आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

