Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»महाराष्ट्र»जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार
महाराष्ट्र

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.
राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील.
आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

January 28, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली…

January 28, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

January 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.