Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»पिंपरी चिंचवड»शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवड

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी (Pragatbharat.com):- पिंपरी चिंचवड शहरासाठी भाजपच्या वतीने महापौरपदासाठी रवी लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापौर म्हणून रवी लांडगे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या सभागृहातून शहरासाठी सर्वंकष विकासाचे निर्णय होतील आणि शहराच्या प्रगतीची घोडदौड कायम राखली जाईल असा विश्वास निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी व्यक्त केला.

 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, भोसरीचे आमदार  महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका नम्रता लोंढे, ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अभिषेक बारणे, माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला शहरातून घवघवीत यश मिळाले. नागरिकांनी भाजपवर एक हाती विश्वास सोपवला आहे. हा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी आता प्रत्येक नगरसेवकाची आहे. “जबाबदार पालक” या नात्याने प्रत्येक नगरसेवक आता काम करणार आहे. भाजपचे शिस्त, संघटन आणि साधनसुचिता या सर्व गोष्टींचे पालन करण्यासाठी महापालिकेचे सभागृह हे अंतिम असेल. या सभागृहातून शहराच्या विकासाला दिशा देण्याचे काम आगामी काळात महापौर म्हणून रवी लांडगे करतील असा विश्वास असल्याचे आमदार जगताप म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार  नगरसेवक रवि बाबासाहेब लांडगे यांनी पक्षाच्या वतीने ‘‘महापौर’’पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी शर्मिलाताई बाबर यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पाणी व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीत सर्वंकष विकास केला जात आहे. विकासाची ही घोडदौड कायम राखण्यासाठी महापालिका सभागृह हे अंतिम असणार आहे. सभागृहातील निर्णय नागरिकांच्या सेवेसाठी आणि सुविधेसाठी घेतले जातील. हा विश्वास महापौर या नात्याने रवी लांडगे आणि, उपमहापौर म्हणून शर्मिला बाबर ठामपणे सार्थ ठरवतील.
– शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड शहर.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड
Next Article जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

”अजितदादांच्या अकाली जाण्याने लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं”.. दुःखात आम्ही सहभागी आहोत– आ. महेश लांडगे…

January 28, 2026

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर…

January 11, 2026

प्रतिभा महाविद्यालयात १८५ जणानी रक्तदान केले तर २४५ जणांनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला.

January 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.