– दोन्ही गावांना प्रत्यक्ष भेट देत जीवनावश्यक वस्तूंच्या २०० किटचे वाटप
– आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ उपक्रम
पिंपरी-चिंचवड -(pragatbharat.com) दुर्गम आदिवासी भागातील कहु आणि कोयाळी या गावांतील गरजू कुटुंबांना नगरसेविका अर्चनाताई राजेशभाऊ सस्ते यांच्या पुढाकारातून जीवनावश्यक वस्तूंच्या २०० किटचे वाटप करण्यात आले. भाजपच्या ‘ई’ प्रभागाच्या (शिवनेरी) अध्यक्षा असलेल्या सस्ते यांनी सहकाऱ्यांसह दोन्ही गावांना भेट देऊन कुटुंबांना प्रत्यक्ष मदत दिली.

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेतर्फे ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त हार-तुरे, पुष्पगुच्छ आणि होर्डिंग्जवर होणारा खर्च गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्याचे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत सस्ते यांनी कहु आणि कोयाळी येथील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

राजेशभाऊ सस्ते यांच्यासह स्थानिक कार्यकर्तेही या उपक्रमात सहभागी झाले. वाटपावेळी ज्ञानेश्वर सस्ते, राजू टेकाळे, प्रताप सासवडे, सचिन बनसोडे, नवनाथ बनकर आणि उदय तापकीर उपस्थित होते. दोन्ही गावांचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक नेते आणि ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते.
प्रतिक्रिया :“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबांना त्यांच्या गावात जाऊन मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतला. कहु आणि कोयाळीतील कुटुंबांना दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंमुळे त्यांच्या दैनंदिन गरजांना हातभार लागेल. या उपक्रमात सहभागी झालेल्या दोन्ही गावांतील ग्रामस्थांचे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानते.”
– अर्चना सस्ते, नगरसेविका तथा ई-प्रभाग अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड.

