मुंबई (pragatbharat.com) : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये १८ एप्रिलच्या भागात प्रेक्षकांना मोठा थरार पाहायला मिळणार आहे. अर्जुनवर झालेल्या खुनाच्या आरोपांमुळे सुभेदार कुटुंबावर संकटाचे सावट आले असताना, सायली आता कुटुंबाच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभी राहिली आहे. सायलीने पत्रकार आणि घराबाहेर जमलेल्या जमावाला सडेतोड उत्तर देत, आपल्या नवऱ्याचा निर्दोषत्व सिद्ध करण्याचा निर्धार केला आहे.
दुसरीकडे, प्रियाने रचलेल्या कटकारस्थानामुळे अर्जुनच्या जामिनात अडचणी येत आहेत. मात्र, अर्जुनने चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना पुराव्यांचा शोध घेण्यास सांगितले असून, सीसीटीव्ही फुटेजमधून मोठे सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. या ट्विस्टमुळे मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

