
नागपूर (pragatbharat.com) : नागपुरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कर्ज घेतलेल्या एका व्यक्तीने पैशांच्या वादातून सावकाराची निर्घृण हत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित सावकाराने कर्जाच्या व्याजाच्या बदल्यात कर्जदाराच्या मुलीबाबत अत्यंत आक्षेपार्ह मागणी केली होती. या मागणीमुळे संतापलेल्या कर्जदाराने सावकाराचा काटा काढला.
सावकाराचा मृतदेह एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत पुलाखाली आढळून आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने धक्कादायक कबुली दिली की, “व्याज देण्यासाठी पैसे नसल्याने सावकाराने माझ्या मुलीला त्याच्याकडे पाठवण्याची मागणी केली होती, जी सहन न झाल्याने मी हे कृत्य केले.” या घटनेमुळे अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

