बहिणीच्या लग्नातच रक्तरंजित थरार! पहिल्या पतीने नातेवाईकांसमोरच पत्नीवर केला जीवघेणा हल्ला

पुणे/सटाणा (pragatbharat.com) : नाशिक जिल्ह्यातील सटाणा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या विवाहसोहळ्याचा आनंद सुरू असतानाच, एका महिलेवर तिच्या पहिल्या पतीने धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळींसमोरच झालेल्या या हल्ल्यामुळे लग्नकार्यात मोठी खळबळ माजली.

संबंधित महिलेचा तिच्या पहिल्या पतीसोबत कायदेशीर घटस्फोट झाला असून ती आपल्या माहेरी राहत होती. याचाच राग मनात धरून आरोपीने भर लग्नमंडपात तिच्या गळ्यावर वार करून हत्येचा प्रयत्न केला. जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी पतीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *