संत रविदास विकास संघटनेतर्फे चर्मकार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

संत तुकारामनगर येथील संत रविदास मंदिरात आयोजन; समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींची नोंदणी

पिंपरी-चिंचवड : (pragatbharat.com)शिरोमणी संत सद्गुरू रविदास विकास संघटना, पुणे यांच्या वतीने चर्मकार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन संत तुकारामनगर येथील संत रविदास मंदिरात करण्यात आले होते. या मेळाव्यात अनेक वधू-वरांनी आपली नोंदणी केली.

या कार्यक्रमाला साप्ताहिक ‘प्रगत भारत’ वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय कांबळे, चर्मकार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक नागनाथ कांबळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजातील परस्पर परिचय वाढवणे हा अशा उपक्रमांचा उद्देश आहे. या मेळाव्याच्या आयोजनासाठी सुखदेवजी सूर्यवंशी, अशोक कांबळे, वसंत कांबळे, भालचंद्र गोरेगावकर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे चर्मकार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकमेकांशी परिचय साधण्याची संधी उपलब्ध झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *