
नवी दिल्ली (pragatbharat.com) : उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाईन (Online) आणि दूरस्थ शिक्षण (Open and Distance Learning – ODL) कोर्सेसच्या मान्यतेसाठी आजपासून (२७ एप्रिल) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उच्च शिक्षण संस्थांना ११ मे २०२६ पर्यंत ‘DEB’ वेब पोर्टलवर आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
या निर्णयामुळे नोकरी करून किंवा घरी बसून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यूजीसीने या वर्षी कोर्सेसच्या गुणवत्तेवर अधिक भर दिला असून, केवळ मान्यताप्राप्त विद्यापीठांनाच हे कोर्सेस चालवण्याची परवानगी दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पारंपारिक कॉलेजमध्ये जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

