
मुंबई/नाशिक (pragatbharat.com) : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेच्या (MMC) निवडणुकीसाठी रविवारी तब्बल १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यभरात मतदान पार पडले. या निवडणुकीत राजभरातील सुमारे १.४३ लाख डॉक्टरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची मतमोजणी २९ एप्रिल रोजी होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. ही निवडणूक पारदर्शक आरोग्य सेवा आणि डॉक्टरांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दुसरीकडे, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. विशाल पवार यांची २०२६-२७ या वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी डॉक्टरांचे आरोग्य आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातील ‘AI’ च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) वाढत्या वापराबाबतचा अहवालही प्रसिद्ध केला, ज्याचा भविष्यातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार आहे.

