
भोसरी : पुणे जिल्हा परिषद, माध्यमिक
शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गुणवत्ता संवर्धन मूल्यांकन २०२५-२६ अभियानांतर्गत इयत्ता पाचवी ते बारावी पिंपरी चिंचवड भोसरी ‘अ’ गटातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, श्री नागेश्वर विद्यालय मोशी, भागशाळा चिखली माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे येथे गुरुवारी (दि. २३ एप्रिल) जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण समारंभामध्ये मा. शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते झाले. श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री सानप सर ,उपमुख्याध्यापिका मा.श्रीम नाणेकर मॅडम, पर्यवेक्षिका मा.सौ.ठोंबरे मॅडम ,पर्यवेक्षिका मा.सौ .पंडित मॅडम शाळेतील सहकारी अध्यापक, अध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरस्कार स्वीकारला .
या कार्यक्रमाला राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव शिवाजीराव कामथे, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, प्राचार्य शिवाजी शिंदे, किशोर बोरसे, सुरेश कांचन, बाळासाहेब चव्हाण, विश्वस्त अरुण थोरात, शिवाजीराव किलकिले, विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होत .


