
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसल्याने, ग्रामीण भागातील १० वी उत्तीर्ण तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
निवड प्रक्रिया आणि पात्रता: या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही १० वीच्या गुणांच्या गुणवत्तेवर (Merit List) आधारित असणार आहे. अर्जदार उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असावा आणि त्याला स्थानिक भाषेचे (मराठी) ज्ञान असणे अनिवार्य आहे. उमेदवाराला संगणक चालवण्याचे प्राथमिक ज्ञान आणि सायकल चालवता येणे आवश्यक आहे. या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली असून, नियमानुसार सवलत लागू असेल.
महत्त्वाच्या अटी: उमेदवारांकडे आधार कार्ड, १० वीचे प्रमाणपत्र आणि जातीचा दाखला (आवश्यक असल्यास) असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील विविध ग्रामीण डाक कार्यालयांमध्ये नियुक्ती दिली जाईल. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे.

