आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी घडामोडी! झिम्बाब्वेची ‘ब्रिक्स’च्या न्यू डेव्हलपमेंट बँकेत प्रवेशासाठी अधिकृत चर्चा सुरू; अर्थव्यवस्थेला मिळणार बळ

हरारे/नवी दिल्ली (pragatbharat.com) : जागतिक अर्थकारणात आणि ‘ब्रिक्स’ (BRICS) समूहाच्या विस्तारामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. आफ्रिकन देश असलेल्या झिम्बाब्वेने (Zimbabwe) ब्रिक्स समूहाच्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’ (New Development Bank – NDB) मधील अधिकृत सदस्यत्वासाठी औपचारिक वाटाघाटी सुरू केल्या आहेत. झिम्बाब्वेचे वित्त, आर्थिक विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री एमथुली नकुबे (Mthuli Ncube) यांनी या ऐतिहासिक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.

बँकेच्या अध्यक्षा दिलमा रुसेफ यांचे अधिकृत पत्र: अर्थमंत्री एमथुली नकुबे यांनी सांगितले की, न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा दिलमा रुसेफ (Dilma Rousseff) यांच्याकडून झिम्बाब्वे सरकारला अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रामध्ये बँकेत सामील होण्याच्या (Accession Process) प्रक्रियेला मान्यता देण्यात आली असून, पूर्ण सदस्यत्व मिळवण्यासाठीची पुढील पावले आणि अटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या संचालक मंडळाने (Board of Directors) घेतलेल्या या निर्णयाचे झिम्बाब्वे सरकारने मनापासून स्वागत केले आहे.

२०३० पर्यंत अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे ध्येय: न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्यत्व मिळाल्यामुळे झिम्बाब्वेला आपल्या देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांसाठी दीर्घकालीन निधी (Long-term development financing) उभारणे सहज शक्य होणार आहे. झिम्बाब्वे सरकारने २०३० पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ‘उच्च-मध्यम-उत्पन्न’ (Upper-middle-income economy) गटामध्ये नेण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, ब्रिक्स बँकेचे हे सदस्यत्व या ध्येयासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *