IPL 2026: मुंबई इंडियन्स ‘या’ ५ मोठ्या खेळाडूंना संघातून रिलीज करणार? हार्दिक पांड्यासह दिग्गजांची नावे समोर

मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ च्या हंगामातील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात आगामी मेगा लिलावापूर्वी मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. गेल्या ६ वर्षांत एकही विजेतेपद न जिंकलेल्या मुंबईला यंदाच्या हंगामात १३ सामन्यांपैकी केवळ ४ सामन्यांत विजय मिळवता आला, तर ९ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत नवव्या स्थानावर फेकल्या गेलेल्या मुंबई इंडियन्सकडून पाच प्रमुख खेळाडूंना संघातून मुक्त (Release) केले जाण्याची दाट शक्यता आहे.

यादीतील ५ संभाव्य खेळाडू:

  • १. हार्दिक पांड्या (Hardik Pandya): या यादीतील सर्वात धक्कादायक नाव म्हणजे कर्णधार हार्दिक पांड्या. या हंगामात हार्दिकला ना फलंदाजीत चमक दाखवता आली, ना गोलंदाजीत तो प्रभाव पाडू शकला. त्याच्या सुमार कामगिरीमुळे फ्रँचायझी त्याला रिलीज करण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकते.
  • २. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav): मिस्टर ३६० आणि मुंबईचा हुकमी एक्का सूर्यकुमार यादवची बॅट यंदा शांतच राहिली. धावा गाठण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला. युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी व्यवस्थापन त्याला वगळू शकते.
  • ३. रॉबिन मिन्झ (Robin Minz): ६५ लाख रुपयांना संघात घेतलेल्या या युवा यष्टिरक्षक-फलंदाजाने मैदानावरील अनेक सोप्या संधी वाया घालवल्या. फलंदाजीतही अपयशी ठरल्याने त्याला मुक्त करणे जवळपास निश्चित आहे.
  • ४. शेरफेन रदरफोर्ड (Sherfane Rutherford): सामन्याचा शेवट करण्याची जबाबदारी असलेल्या या कॅरिबियन अष्टपैलू खेळाडूने मुंबई इंडियन्सच्या अपेक्षांवर पाणी फेरले.
  • ५. दीपक चहर (Deepak Chahar): ९.२५ कोटींची मोठी रक्कम मोजून संघात घेतलेला दीपक चहर ७ सामन्यांत केवळ ४ बळी घेऊ शकला. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखण्यात अपयशी ठरल्याने त्याला रिलीज केले जाण्याची शक्यता अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *