जेष्ठ नागरिक विचार मंचाचा उपक्रम; चर्मकार समाजातील समाजसेवेसाठी कार्यरत डॉक्टरांचा ७ जून रोजी अकोला येथे गौरव

अकोला (pragatbharat.com) : अकोला शहरातील रहिवासी असलेले चर्मकार समाजातील डॉक्टर जे अकोल्यात व इतरत्र वैद्यकीय सेवा देतात तसेच इतरत्र ठिकाणचे रहिवासी असलेले अकोल्यात सेवा देतात, अशा सेवाभावी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक विचार मंच, अकोला यांच्या

वतीने “डॉक्टर्स सन्मान -सत्कार सोहळा २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता प्रमिलाताई ओक सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात अॅलोपॅथी, आयुर्वे द, होमिओपॅथी, दंतचिकित्सा तसेच फिजिओथेरपी अशा विविध वैद्यकीय शाखांमध्ये कार्यरत असलेल्या नोंदणीकृत डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून, समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या डॉक्टरांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आयोजकांचा मानस आहे. मानवी जीवन वाचविण्याच्या पवित्र कार्यात योगदान देणाऱ्या, रुग्णांच्या वेदनेत आधार बनणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करणे ही समाजाची नैतिक जबाबदारी

असल्याची भावना विचारमंचाने व्यक्त केली आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी मान्यवर डॉक्टरांची माहिती द्यावी, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे. संपर्क-रामभाऊ ताजने (८३९०७४५०४२), प्रा. गजानन पदमणे (९४२२९६०३०३), मधु-सूदन गव्हाळे (९७६४७७३३६३), प्रभाकर रेवस्कर (९४२०८३९५९४), गजानन काकडे (९४०४८४८८५)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *