
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनची सन 2025- 26 ची वार्षिक सर्वसाधारण सभा व निवडणूक भारतीय क्रीडा मंदिर वडाळा मुंबई येथे दिनांक 31 /5/ 2026 रोजी सकाळी साडेअकरा वाजता पार पडली.
या निवडणुकीत सन 2026 ते 2030 या कालावधीसाठी महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा संजय शेटे अध्यक्ष तर मकरंद जोशी सचिव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीसाठी भारतीय जिम्नास्टिक्स महासंघातर्फे निरीक्षक म्हणून सुदेश ठाकूर (गोवा) तर महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन तर्फे निरीक्षक म्हणून एडवोकेट विक्रम रोठे हे उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून एडवोकेट शरद मडके यांनी काम पाहिले.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात राज्य संघटनेची निवडणूक पार पडली. नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष:- संजय शेटे मुंबई शहर,
वरिष्ठ उपाध्यक्ष: -मनोज कोटक मुंबई उपनगर,
उपाध्यक्ष:- उत्तम लटपटे परभणी, इंद्रजीत सिंग राठोड मुंबई उपनगर, तन्वी शेटे मुंबई शहर, माधुरी चेंडके अमरावती,
सचिव:- डॉ. मकरंद जोशी जालना,

कोषाध्यक्ष सविता मराठे पुणे,
सहसचिव:- दीपक सावंत सांगली, पुरुषोत्तम दारव्हाणकर नागपूर, संजय तोरस्कर, कोल्हापूर, राकेश केदारे नाशिक,
कार्यकारणी सदस्य:- प्रवीण पाटील जळगाव, संजय मंगोडेकर पिंपरी चिंचवड, मयुरेश एकबोटे पुणे, हर्षल मोगरे छत्रपती संभाजीनगर, दुर्गराज रामटेके चंद्रपूर.
सदरील वृत्तांस आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी द्यावे ही नम्र विनंती.
आ.
सचिव,
डॉ. मकरंद जोशी



