टाळगाव चिखली प्रभाग क्रमांक १ मधील इंदिरागांधी उद्यानाला दिवस-रात्र सुरक्षारक्षक महापलिकेने ठेवावा

चिखली (pragatbharat.com) : टाळगाव चिखली प्रभाग क्रमांक १ मधील पाटील नगर येथील व इंदिरागांधी नगर येथील असलेल्या इंदिरागांधी उद्यान हे पिंपरी चिं-चवड महानगरपालिकेच्या वतीने येथील महापालिकेचा कर भरनारे नागरिक यांच्या उत्तम आरोग्यासाठी व उद्यानामध्ये बसण्यासाठी स्थापित केला आहे.

या उद्यानामध्ये नागरिकांची वरदळ वाढत असून इंदिरा गांधी उद्यानाचा पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना लाभ मिळत नसून उद्यानामधील नागरिकांसाठी असलेला वॉकींग ट्रक फुटपाथ यांचे काम रखडले असून तसेच तसेच उद्यानाला दिवसा व रात्री वाचमेन नसल्यामुळे उद्यानामध्ये

उद्यान विभाग
भटकी कुत्री मोठया प्रमाणात येत असतात तसेच त्यामुळे परिसर अस्वच्छ होत असतो.

तसेच रात्रीच्या वेळी काही मद्यपी
व्यक्ती उद्यानामध्ये येत असून परिसरातील नागरिक ही त्यामुळे असुरशिक्षित झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

तसेच उद्यानापरिसरात सीसीकॅमेरा नाही तसेच याबाबत उद्यानविभागातील संबधीत अधिकारी व नगरसेवक यांना ही याबाबत सुचना माहिती येथील नागरिकांनी दिली असल्याचे सांगितले आहे. तरी महापालिकेच्या संबधित विभागातील अधिकारी व नगरसेवक यांनी इंदिरा गांधी उद्यानाची शुशोभीकर व दिवस रात्र सुरक्षारक्षक ठेवण्यात यावा की ज्या मुळे उद्यानामधील झाडे व परिसर तसेच नागरिकांसाठी असलेल्या व्यायाम साहित्यांची सुरक्षा ठेवली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *