Gold Price Today 13 June 2026: सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड मोठी वाढ; मुंबई, पुण्यासह दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे भाव गगनाला, चांदी २,६०,१०० रुपयांवर!

मुंबई (pragatbharat.com) : जागतिक बाजारातील घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली सोन्याची घसरण अखेर शनिवारी (१३ जून) थांबली असून, देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराने यांच्यातील तणावावर राजनैतिक तोडगा निघण्याचे संकेत मिळाल्यामुळे मौल्यवान धातूंमधील गुंतवणूकदारांची रुची पुन्हा वाढली असून, त्याचा थेट परिणाम दरांवर दिसून येत आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) : शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या दरांनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी १,४५,८३० रुपयांवर पोहोचला आहे, तर २२-कॅरेट सोन्यासाठी १,३६,३६० रुपये मोजावे लागत आहेत. आर्थिक राजधानी मुंबई, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरू या शहरांमध्ये २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी १,४५,८९० रुपये इतका नोंदवला गेला आहे, तर २२-कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम १,३६,२१०० रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये सोन्याचे दर सर्वाधिक असून, तिथे २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५०,५६० रुपये आणि २२-कॅरेटचा भाव १,३८,०१० रुपयांवर गेला आहे.

चांदीच्या दरातही भडका, खरेदीदारांची धास्ती वाढली: सोन्याच्या दरवाढीसोबतच आज चांदीच्या किमतीतही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. १३ जूनच्या सकाळपर्यंत चांदीचा दर प्रति किलो तब्बल २,६०,१०० रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा (तात्काळ व्यवहारासाठीचे सोने) व्यापार प्रति औंस ४,२०६.८८ डॉलर्स या दराने होत आहे, तर ‘स्पॉट’ चांदीचा दर प्रति औंस ६७.०२ डॉलर्सवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, अमेरिकी डॉलर निर्देशांक आणि बॉण्ड उत्पन्नातील घट या जागतिक कारणांमुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वळल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऐन लग्नसराईच्या काळात दर वाढल्याने सामान्य ग्राहकांमध्ये मात्र मोठी धास्ती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *