महाराष्ट्र पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज मुदत वाढली; आता २ जुलैपर्यंत करता येणार नोंदणी

मुंबई, २२ जून २०२६ : राज्यातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकी पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.

राज्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडून नोंदणी सुरू असून आतापर्यंत सुमारे १.४५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून अर्जाची मुदत २ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) मार्फत राबविण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, कागदपत्र पडताळणी आणि पुढील टप्प्यांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत संकेतस्थळांचा वापर करूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि अनधिकृत संस्था किंवा मान्यता नसलेल्या अभ्यासक्रमांपासून सावध राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *