बाबासाहेबांच्या विचारांमुळे कांशीरामजी यांनी 

देशात राजकीय क्रांती घडवली-मुकुंद सोनवणे

           हिंगोली (pragatbharat.com) : महाराष्ट्रातील दलित हे रक्त व घराणे सांभाळीत बसले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कोण जोपासदैनिकणार ? “जय भीम का नारा गुंजेगा, भारत के कोने कोने में !” असे म्हणत मान्यवर कांशीरामजी यांनी संपूर्ण भारतात बाबासाहेबांचे विचार पोहचविण्याचे काम केले व या विचारातूनच राजकीय क्रांती घडवून आणली असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव मुकुंद सोनवणे यांनी केले.

          शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे बहुजन समाज पक्षाच्या वतीने आयोजित समीक्षा बैठक व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुकुंद सोनवणे हे बोलत होते. सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

          आपल्या मार्गदर्शनात मा. मुकुंद सोनवणे पुढे म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले यांना लग्नाच्या वरातीतून हाकलण्यात आले तेंव्हा त्यांच्यात सनातनी व्यवस्थेबद्दल चीड निर्माण झाली. गुलामीची जाणीव झाल्याशिवाय माणूस बंड पुकारीत नाही तर आजच्या या गुलामीच्या व्यवस्थेची तुम्हाला चीड का येत नाही ? आम्हाला पाण्याला शिवण्याचा अधिकार नव्हता तेंव्हा बाबासाहेबांना चवदार तळ्याचा संघर्ष करावा लागला. याची जाण ठेवून आमचे पक्ष संघटन वाढविणे आणि जिल्हा परिषदेपासून ते आमदार, खासदारपर्यंत मजल मारली पाहिजे. राज्यात बहुजन समाज पार्टीची सत्ता आली पाहिजे या हिशोबाने कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे.

         बहुजन समाज पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी यावेळी प्रशिक्षण दिले. मान्यवर साहेब कांशीरामजी यांनी केलेला त्याग व बाबासाहेबांचा स्वाभिमानी विचार देशभर कसा पोहोचविला ते सविस्तर सांगितले तर बहुजन समाज पक्षाचे मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे यांनीही यावेळी हिंगोली जिल्ह्यातून एक खासदार व तीन आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले.

         बहुजन समाज पक्षाचे हिंगोली जिल्हा महासचिव आनंदराव पंडित यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व शेवटी आभार प्रदर्शन केले. जिल्हाध्यक्ष देवराव भगत यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील बसपाच्या कार्याचा आढावा सादर केला. असंख्य मुस्लीम कार्यकर्त्यांनी यावेळी बहुजन समाज पक्षात जाहिर प्रवेश केला. शाहिर गौतम धोंगडे यांनी यावेळी प्रबोधन गीते सादर केली.

          बहुजन समाज पक्षाचे राज्य सचिव रमेश भिसे पाटील, नांदेड जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे, हिंगोली जिल्हा निरीक्षक देवराव खंदारे, ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजीराव राऊत, हिंगोली विधानसभा अध्यक्ष रामभाऊ बनकर, कळमनुरी अध्यक्ष गंगाराम खिल्लारे, अशोकराव हिवरकर, कुरा पठाण, प्रभाकर उबाळे, वसंत पाईकराव, शाहेदखान पठाण, उत्तम खडसे, तुराबशा साहब, खादीर भाई, संदीप पायघन, अर्जुन काटकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *