पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूरवासीयांचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

  • सार्वजनिबांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते  डॉ. धनंजय वर्णेकर ‘समाजभूषण’ पुरस्काराने’ सन्मानित…
  • पिंपरी-चिंचवड (Pragatbharat.com):- पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूरवासीयांच्या वतीने आयोजित कौटुंबिक स्नेहमेळावा आणि गुणवंतांचा सत्कार समारंभ रविवारी (दि. २३ ऑगस्ट २०२६) साकोसा प्राधिकरण येथे उत्साहात पार पडला. दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.

नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या शितल धनंजय वर्णेकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक व समाजोपयोगी क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे डॉ. धनंजय वर्णेकर यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, शैलजा मोरे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.

गुणवंतांचा गौरव करण्याबरोबरच विविध क्षेत्रांत कार्यरत नागरिकांना एकत्र आणत सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश या स्नेहमेळाव्यातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *