पिंपरी-( pragatbharat.com)- मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसांना ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अपघातात मालमत्तेचे नुकसान झाल्यास शासकीय मूल्यमापनानुसार नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकरणांमध्ये कार्यवाही अधिक सुसूत्र, पारदर्शक व संवेदनशील पद्धतीने करून प्रवासीहिताचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला.


शहरांच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन बसेसची उपलब्धता, प्रवासी संख्येनुसार बसफेऱ्यांचे नियोजन, मेट्रो व अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पूरक फीडर सेवा अधिक सक्षम करणे तसेच बसेसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करणे, या बाबींचाही आढावा घेण्यात आला. उपलब्ध बस ताफ्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करून नागरिकांना वेळेवर, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
३७ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय
यासोबतच महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने पात्र कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी विषय तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रशासकीय विषयांचा विचार करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर नियमांच्या चौकटीत सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. तसेच ३७ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

महामंडळाच्या प्रशासकीय व आर्थिक कामकाजामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया, वैधानिक लेखापरीक्षण, वार्षिक अनुपालन अहवाल, वस्तू व सेवा कर (GST), स्रोतावर करकपात (TDS), व्यावसायिक कर (PT) तसेच कंपनी निबंधक कार्यालयाशी (ROC) संबंधित अनुपालनाच्या विषयांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
“ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा होणार” — महापौर रवि लांडगे
“पीएमपीएमएल ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बस पासमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णय आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ व परवडणारा होईल. त्याचबरोबर अपघातातील जखमींना १ लाख आणि दुर्दैवी मृत्यू झाल्यास ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक ठोस सुरक्षाकवच मिळेल. नवीन बसेसची उपलब्धता, सक्षम फीडर सेवा आणि ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित, वेळेवर, सुलभ आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपीएमएलची कार्यक्षमता अधिक वाढविण्यावर आमचा भर राहील.”
रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“प्रवासीहिताचे निर्णय प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी पाठपुरावा करणार” — अभिषेक बारणे
“६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बस पासमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयामुळे हजारो ज्येष्ठ नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर अपघातग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबत निश्चित धोरण केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असल्याने उपलब्ध बस ताफ्याचा प्रभावी वापर, नवीन बसेस, फीडर सेवेचे सक्षम जाळे, बस ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करणे आणि प्रवासी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या बाबींवर प्राधान्याने कार्यवाही होणे आवश्यक आहे. पीएमपीएमएलची सेवा अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्यासह प्रवासीहिताचे निर्णय प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.”
अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
बैठकीत पीएमपीएमएलच्या एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करून ‘प्रवासी सुरक्षितता, सेवा गुणवत्ता आणि प्रवासीहित’ या प्रमुख बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ, विश्वासार्ह आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.

