पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा  दीप्ती चवधरी यांच्या १०० दिवसांच्या कार्यअहवालाचे

लोकसभेतील विरोधी पक्षनेते  राहुल गांधी यांच्या हस्ते नाशिक येथील शिबीरामध्ये प्रकाशन.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा. खा. राहुल गांधी यांनी नाशिक येथे महाराष्ट्रातील काँग्रेस अध्यक्षांच्या शिबीरात येऊन मार्गदर्शन केले. तसेच सर्व अध्यक्षांच्या कुटूंबीयांना देखील भेटले व आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी तयार केलेल्या त्यांच्या पहिल्या १०० दिवसांच्या कामाचा अहवाल मा. खा. राहुल गांधी यांनी प्रकाशित केला आणि काँग्रेस पक्षाचे कार्य असेच जोमाने चालू ठेवा अशा शुभेच्छा दिल्या.

     दीप्ती चवधरी यांना पश्चिम विभागाच्या अध्यक्ष पदाचे नेमणुक पत्र मिळाल्यानंतर त्यांनी पदभार स्विकारला व त्या नंतरच्या १०० दिवसांचा कार्यअहवाल तयार केला याचे प्रकाशन मा. खा. राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यामुळे माझा उत्साह वाढला असून अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली असे दीप्ती चवधरी या निमित्त म्हणाल्या.

     या प्रसंगी त्यांचे कुटूंबिय अंकुर चवधरी व हिना चवधरी हे उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *