महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 800 नागरिकांना लाभ*
*पिंपरी-चिंचवड:(pragatbharat.com) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कै. प्रकाश (आप्पा) काळभोर आणि कै. गोदावरी रखमाजी काळभोर यांच्या स्मरणार्थ, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त *NCMC ST स्मार्ट कार्ड* शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सुमारे *800 नागरिकांनी* स्मार्ट कार्ड काढले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रथम महिला नगरसेविका (मनसे) *सौ. अश्विनी सचिन चिखले-मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त* आजपासून या कार्डचे वाटप सुरू करण्यात आले.
या कार्डामुळे एस.टी., मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतुकीत कॅशलेस प्रवास शक्य होणार असून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि नित्य प्रवाशांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी शहराध्यक्ष *मा. सचिनभाऊ चिखले*, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

