प्रा. संजय पोपट शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान


‘एज्युकेशन ४.०’ तंत्रज्ञानावर आधारित संशोधनाला पुणे विद्यापीठाची मान्यता


पुणे :-(pragatbharat.com) -माईर्स एम.आय.टी. संत ज्ञानेश्वर बी.एड. महाविद्यालय, आळंदी (देवाची) येथील
शिक्षणशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक संजय पोपट शिंदे यांनी सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली आहे.
त्यांनी आपले संशोधन शिक्षणशास्त्र (आंतरविद्याशाखा) या विद्याशाखेतून पूर्ण केले असून,
त्यांना प्राचार्य डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.त्यांच्या
संशोधनाचा विषय “Programme Based on Education 4.0 Technology for
Developing Technological Skills of Teacher Trainees” (मराठीत आशय: शिक्षक
प्रशिक्षणार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांच्या विकासासाठी एज्युकेशन ४.० तंत्रज्ञानावर आधारित
कार्यक्रम) असा होता.
शैक्षणिक क्षेत्रासोबतच प्रा. संजय शिंदे हे बालपणापासून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय
विश्व विद्यालयाशी जोडलेले असून ते नियमित राजयोगाचा अभ्यास व साधना करतात.
त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, एम.आय.टी. आर्ट्स, कॉमर्स
अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, एम.आय.टी. बी.एड. महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. समाधान निकुंभ, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच
मित्रपरिवाराने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक व सामाजिक
वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *