
पिंपरी (दि. २९ मार्च २०२५) :- दहशत माजवुन चौघांनी ‘दर महिन्याला तुम्हाला चार हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’, अशी व्यावसायिकाकडे मागणी केली. त्यास नकार दिल्याने कोयता हातावर मारुन त्यांना दुखापत केली.

दरम्यान दुकानांच्या काऊण्टरची काच फोडुन हातात दगड घेवुन तो दगड मुकेश यांच्या दिशेने फेकुन मारला. शिवीगाळ करुन आम्हाला पैसे दयावेच लागतील असे म्हणत फिर्यादीच्या दुकानाच्या बाजुला असलेली मारुती कंपनीची ओमनी कार व त्या शेजारील कारवर दगड मारुन त्यांच्या काचा फोडुन नुकसान केले.
जाताना हातातील कोयता हवेत फिरवित दहशत करित सर्व मोठ्याने ओरडत निघुन गेले त्यामुळे परिसरांतील लोकांनी घाबरुन जावुन त्यांची दुकाने बंद केली, अस फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २७) रात्री नऊ वाजता आंगनवाडी चौक, मोरेवस्ती चिखली येथील श्रीशांन्तीनाथ टेलीकॉम दुकानासमोर घडला.
करमीराम मुपाराम देवासी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १) कार्तीक ऊर्फ फुक्या जाधव, २) आर्यन ऊर्फ अशोक रयकाल, ३) शुभम जाधव सर्व रा.मोरेवस्ती चिखली व त्यांच्या सोबत त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि देवकुळे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान चिखलीत गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडूनच सवाल उपस्थित होत आहेत.