चिखली:- (pragatbharat.com)माध्यमिक विद्यालय काळभोरनगर भाग शाळा चिखली प्रिय भारतीय जवान भाऊ

राखीच्या या पवित्र सणानिमीत्त, आपल्या बहिणीकडून आपल्याला मन:पूर्वक शुभेछ्या! आम्ही सर्व
भारतीय नागरिक आपले अत्यंत ऋणी आहोत, कारण तुम्ही घरापासून दूर राहून , स्वतःच्या
कुटुंबापासून वेगळे राहून, आमच्या सुरक्षेसाठी सतत सज्ज असता.तुमच्यामुळेच आम्ही शांततेत हे सण साजरे करू शकतो . आम्ही तुमच्या शौर्याला , त्यागाला आणि समरपणाला सलाम करतो. ही राखी तुम्हाला आमच्या मायेचा आणि विश्वासाचा धागा समजून घ्या
जो सदैव तुमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो.तुम्ही सुरक्षित, आनंदी आणि खंबीर राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
गेल्या दोन वर्षापासून भारतीय जवानासाठी हा उपक्रम राबवला जातो आणि या मध्ये सर्व विद्यार्थी
तसेच शिक्षक एकत्र येऊन राखी बनवतात आणि देश रक्षा करणार्यासाठी त्या पाठवल्या जातात.
यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या सीमेवरील जवानांना पोस्टाने पाठविण्यात आल्या या
प्रसंगी मा मुख्याध्यापक श्री. केदार सर, श्री कोपनर एस , श्रीम भारंबे के, बाभूळगावकर एस , बनसोडे
एम, दमाहे एस, अंभोरे पी , भामरे एस , जाधव ए, इंदुलकर पी, पवारा एल , आंदुरे आय, इ. शिक्षक
उपस्थित होते. सर्वांनी जवानांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठविले.