
आळंदी देवाची (pragatbharat.com) : अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी, “व चर्मकार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी निर्णायक, राज्यव्यापी महाबैठक
भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेला आरक्षणाचा अधिकार हा सामाजिक, शैक्षणिक व ऐतिहासिक अन्यायाची घटनात्मक भरपाई आहे. सध्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (Categorization) करून समाजाची एकसंधता कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि आपल्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी समस्त चर्मकार समाजाची एक महत्त्वाची “राज्यव्यापी महाबैठक,,निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
या बैठकीला आपल्या सर्वांची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः श्रवण यांनी या बैठकीला आवर्जून हजर राहायचे आहे.

स्थळ : समस्त हराळे वैष्णव चर्मकार समाज धर्मशाळा संस्थान,
(माऊली मंदिरासमोर) श्री क्षेत्र आळंदी देवाची.
दिनांक : गुरुवार, २८ मे २०२६
वेळ : सकाळी ११:०० वाजता
महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, समाजाचे विद्यमान व माजी आमदार-खासदार, विद्यमान व माजी मंत्री, ज्येष्ठ मंडळी आणि युवक बांधवांनी या बैठकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
आपल्या सर्वांच्या सामूहिक विचारातून, लोकशाही मार्गाने आणि संविधानिक चौकटीत राहून समाजाच्या प्रगतीचा व एकजुटीचा निर्णायक आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.
आपली उपस्थिती हीच समाजाची ताकद!
।। धन्यवाद ।।
आयोजक : समस्त हराळे वैष्णव चर्मकार समाज धर्मशाळा संस्थान, श्री क्षेत्र आळंदी देवाची व महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या सर्व संघटना समाज बांधव..



