टाळगाव चिखली मधील यशवंत कॉलनी साने चौक येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात… ? महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लक्ष घालावे… ज्येष्ठ नागरिक तुकाराम मोरे यांचे मत..

टाळगाव चिखली:-येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मधील साने चौक यशवंत कॉलनी साई मंदिरासमोरील मोरे वस्ती येथील असलेल्या रस्त्यामधील असलेल्या सांडपाणी व इतर विसर्जनासाठी असलेल्या चेंबर वेळोवेळी तुंबत असून तसेच चेंबर हा चोकोप होत असून त्यामुळे चेंबरच्या जाकना वरून विविध सांडपाणी व अस्वच्छ पाणी याची दुर्गंधीयुक्त पाणी या परिसरात पसरले असून रस्त्यावर आलेल्या या अस्वच्छ सांडपाण्यामुळे येथील रहिवासी नागरिकांच्या घरामध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले असून असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी योग्य ती दखल  घ्यावी असे मत येथील रहिवासी व काळुबाई व तुळजाभवानी सेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक तुकाराम भागुजी  मोरे यांनी सांगितले आहे 

अधिक माहिती देताना तुकाराम भागुजी मोरे यांनी पुढे सांगितले की वरील समस्या बाबत गेले अनेक दिवस संबंधित विभागातील महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना व नगर सदस्यांना याबाबत माहिती दिली आहे. तरी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालावे कारण या परिसरात नागरी वस्ती वाढत असून सदरचा चेंबर हा अनेक वर्षांपूर्वी बांधला गेले असल्यामुळे तसेच चेंबर वरील झाकण हे जुने झाले असून मोडकळीस आले आहेत. तसेच जुन्या पाईपलाईन मुळे चेंबर तुंबने व त्यामुळे अस्वच्छता पसरणे हे वेळोवेळी पाहावयास मिळत आहे. तसेच या रस्त्यालगतच असलेल्या छोट्या व जुन्या नाल्यामध्येही मोठ्या प्रमाणात गाळ व माती तसेच अनेक छोटे मोठे वस्तू पडल्यामुळे व त्या अडकल्यामुळे नाल्याचा प्रवाह  पाहिजे त्या प्रमाणात वाहत नाही. याबाबतही लक्ष घालावे असे तुकाराम मोरे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *