“तिला जिथे जेवढं स्पर्श करायचं होतं…”; रीना रॉय यांनी नकार देताच भडकले होते शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ पत्रकाराचा बॉलिवूडमधील सर्वात मोठा खुलासा!

मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूडचे ‘शॉटगन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) त्यांच्या दमदार अभिनयासोबतच त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ८० आणि ९० च्या दशकात शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय (Reena Roy) यांच्या अफेअरच्या चर्चांनी संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघालं होतं. आता या दोघांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपनंतरच्या एका अत्यंत खळबळजनक किश्श्याबद्दल ज्येष्ठ चित्रपट पत्रकार ज्योती वेंकटेश (Senior Journalist Jyoti Venkatesh) यांनी एक मोठा खुलासा केला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

रीना रॉय यांनी काम करण्यास नकार देताच शत्रुघ्न सिन्हा भडकले: पत्रकार ज्योती वेंकटेश यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. एका जुन्या मॅगझिनमधील मुलाखतीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, जेव्हा रीना रॉय यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत आगामी चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता, तेव्हा शत्रुघ्न सिन्हा प्रचंड संतापले होते. मुलाखतीत या नकाराबद्दल विचारले असता शत्रुघ्न सिन्हा रागाच्या भरात म्हणाले होते, “ती माझ्यासोबत काम करणार नाही असं कसं बोलू शकते? तिला जिथे जेवढं स्पर्श करायचं होतं तेवढं तिने केलंय, आता पुढे तिला स्पर्श करण्याची माझी जराही इच्छा नाही…” शत्रुघ्न यांच्या या अद्वातद्वा वक्तव्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती.

रीना यांच्यासाठी कमी केलं होतं मानधन; ७ वर्षांच्या नात्याचा झाला दुर्दैवी अंत: नात्यात दुरावा आल्यानंतरही शत्रुघ्न सिन्हा यांना रीना रॉय यांच्यासोबत काम करायचे होते. ज्योती वेंकटेश यांनी पुढे सांगितले की, एका चित्रपटात रीना रॉय यांना कास्ट करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी निर्मात्यांना फोन करून स्वतःचे मानधन (Fees) कमी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, तरीही रीना यांनी नकार दिल्यामुळे अखेर त्या चित्रपटात अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांना घेण्यात आले. शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय तब्बल ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. रीना यांना शत्रुघ्न यांच्याशी लग्न करायचे होते, परंतु शत्रुघ्न सिन्हा आधीच विवाहित असल्यामुळे त्यांनी कुटुंबाची निवड केली आणि या दोन्ही स्टार्सच्या प्रेमाचा अंत अत्यंत वाईट आणि कटू पद्धतीने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *