
जागतिक ट्यूना दिन (World Tuna Day): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि ‘ट्यूना’ माशाच्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी २ मे रोजी ‘जागतिक ट्यूना दिन’ पाळला जातो. सागरी संसाधनांचा शाश्वत वापर आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ट्यूना माशाचे महत्त्व या दिवशी अधोरेखित केले जाते.

