पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी केल्या प्रार्थना

नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवत पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक विशेष पोस्ट शेअर करत राहुल गांधी यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो, हीच प्रार्थना.” पंतप्रधानांच्या या सदिच्छा पोस्टची राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडूनही शुभेच्छा : पंतप्रधानांशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संसदेतील लोकशाही परंपरांचा आदर करत दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सकारात्मक संदेश पाठवले आहेत. देशभरातून काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि विरोधी आघाडीतील विविध दिग्गज नेत्यांकडूनही राहुल गांधी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *