पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन…

पिंपरी-चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव अमृतराव शिर्के (वय ८१ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) निधन झाले. शिवाजीराव शिर्के यांनी पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, फुगेवाडी ज्येष्ठ नागरिक संघ आदी संस्थांचे अध्यक्षपद भूषवले आहे. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांचे ते वडील होत. तसेच ओबीसी कल्याण विभागाचे सहसंचालक प्रशांत शामराव शिर्के यांचे ते चुलते होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

शिवाजीराव शिर्के यांनी प्रवीण प्रकाशन या संस्थेच्या माध्यमातून “महाराणी येसूबाई यांचा इतिहास” हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ हे पारितोषिक मिळाले आहे. तसेच ‘राजे शिर्के घराण्याचा इतिहास’, ‘कृष्णाकाठ ते पवनाकाठ’ हे आत्मचरित्र कालभैरव, शिरकाण आदी पुस्तके आणि अनेक कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत. सातारा जिल्ह्यातील उद्योजकांचा परिचय करून देणारे ‘सातारचे रत्न’ हे देखील त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. ‘पराचा कावळा’, ‘ही पैशाची किमया’ आदी नाटकांचेही त्यांनी लेखन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *