महाराष्ट्र सरकारी नोकरी अपडेट: MPSC ‘गट-ब’ ५५२ पदांसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची संधी; तातडीने करा अर्ज!

मुंबई/पुणे (pragatbharat.com) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विविध ५५२ पदांसाठी जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ३० एप्रिल २०२६ पर्यंतच ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.

या भरतीमध्ये प्रामुख्याने खालील पदांचा समावेश आहे:

  • पोलीस उपनिरीक्षक (PSI): ३१० पदे
  • राज्य कर निरीक्षक (STI): २३६ पदे
  • सहायक कक्ष अधिकारी (ASO): ०६ पदे

या परीक्षेसाठी किमान पदवीधर उमेदवार पात्र असून, पूर्व परीक्षा १६ मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर पार पडणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांनी तांत्रिक अडथळे टाळण्यासाठी आजच प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *