प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी-चिंचवड(pragatbharat.com)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे तर्फे पिंपरी-चिंचवड येथे आयोजित ‘राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ चा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. लोकजागृती व वैचारिक प्रबोधन घडवणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होऊन विजेत्या गणेश मंडळांचा सन्मान करताना मन आनंदित झाले. बाप्पाच्या आशीर्वादाने आणि अशा लोकोपयोगी उपक्रमांमुळे पिंपरी-चिंचवडचे सांस्कृतिक आणि सामाजिक वैभव अधिक समृद्ध होत आहे.

सर्व विजेत्या मंडळांचे मनःपूर्वक अभिनंदन!-यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनिलराव रासने, कोषाध्यक्ष श्री. महेशराव सुर्यवंशी, सरचिटणीस आ.श्री. हेमंतराव रासने, सहचिटणीस श्री. अमोल केदारी आणि उत्सव प्रमुख श्री. अक्षय गोडसे उपस्थित होते. तसेच सुवर्णयुग तरूण मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष श्री. सौरभ रायकर आणि कार्याध्यक्ष श्री. यतिश रासने हेदेखील उपस्थित होते. महानगरपालिका व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये महापौर श्री. रवी लांडगे, उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर, विरोधी पक्षनेते श्री. भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कला, क्रीडा, सांस्कृतिक विभाग सभापती श्री. कैलास कुटे, नगरसेविका सौ. स्नेहाताई कलाटे आणि मा. उपमहापौर श्री. कैलासजी भांबुरडेकर यांचा समावेश होता. याशिवाय श्री. मंगेश सुर्यवंशी, श्री. विनायक रासने, श्री. तुषार रायकर, श्री. प्रतिक घोडके, श्री. सचिन आखाडे, श्री. रूणाल केसरकर, श्री. चेतन रायकर, श्री. राजाभाऊ पायमोडे, श्री. बापू ढमाले आणि श्री. दिनेश परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजनाबद्दल श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनीलराव रासने आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. बाप्पाच्या आशीर्वादाने पिंपरी-चिंचवडचे सांस्कृतिक वैभव असेच समृद्ध होत राहो!

