समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अपरिहार्य डॉ. अविनाश इंगळे यांचे डॉक्टरांच्या सन्मान

अकोला (pragatbharat.com) : मानवतेच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या चर्मकार समाजातील मान्यवर डॉक्टरांचा भव्य सन्मान सोहळा ज्येष्ठ नागरिक विचार मंच, अकोला यांच्या वतीने प्रमिलाताई ओक हॉल येथे अत्यंत संपन्न झाला.
रुग्णसेवा, सेवाभाव आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याद्वारे लोककल्याणाची अखंड ज्योत तेवत ठेवणाऱ्या चर्मकार समाजातील विविध वैद्यकीय शाखांमध्ये कार्यरत अनेक मान्यवर डॉक्टरांची उपस्थिती लाभल्याने हा सन्मान सोहळा अभिमान, प्रेरणा आणि एकात्मतेचा अविस्मरणीय सोहळा ठरला. समाजहित, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा यांचा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याचा यावेळी यथोचित गौरव करण्यात आला. आपल्या ज्ञान, अनुभव आणि अथक परिश्रमांच्या बळावर हजारो रुग्णांना नवजीवन देणाऱ्या या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या भव्य कार्यक्रमाचे उदघाटन सेवा निवृत्त जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. शंकरराव उंबरकर यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन तथा संत रविदास, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. अविनाशजी इंगळे वैद्यकीय अधिष्ठाता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान रायपुर हे होते. वैद्यकीय क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा केलेले, अध्यापन, संशोधन व आरोग्यसेवा या तिन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विठ्ठलराव दांडगे हे प्रमुख अतिथी म्हणून विचारमंचावर उपस्थित होते. तसेच डॉ कल्याणीताई पदमने आयुर्वेद कन्सल्टंट व योगतज्ञ व डॉ. जयश्रीताई आयरे वैद्यकीय अधिकारी एच पी सी एल रुग्णालय रामागुंडम यांचीही प्रमुख उपस्थिती होती. श्री प्रल्हाद शेकोकार सेवानिवृत्त उप प्रबंधक डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची मंचावर विशेष उपस्थिती लाभली. प्रा. गजानन पदमने यांनी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रल्हाद शेकोकार यांनी केले याप्रसंगी कार्यक्रमास विशेष सहकार्य तथा योगदान देणारे सर्वश्री प्रा. राहुल शेगोकार, दिनकरराव वानखडे, डॉ अनिकेत भटकर, डॉ. कांचन किशोर शेगोकार, भास्करराव वजीरे, ज्ञानेश पदमने, पांडुरंगजी चोपडे, डॉ. अप्पासाहेब डामरे व किशोर शेगोकार यांचे हृद सत्कार करण्यात आला. विविध नाविन्यपूर्ण व समाजास प्रेरणा देणारे उपक्रम राबविणाऱ्या ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या पदाधिकारी तथा सदस्यांचे सलाह प्रायव्हेट लिमिटेड अकोला यांच्या वतीने मान्यवरांचे हस्ते शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण अभिष्टचिंतन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजातील मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टरांच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करताना, आरोग्यसेवा ही केवळ व्यवसाय नसून मानवसेवेचे सर्वोच्च माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. समाजातील नव्या पिढीने या यशस्वी डॉक्टरांकडून प्रेरणा घेऊन शिक्षण, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर्श अंगीकारावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. सत्कारमूर्ती डॉक्टरांनीही आपल्या यशामागील संघर्ष, कुटुंबीयांचे सहकार्य आणि समाजाच्या पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सन्मानामुळे समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे बहारदार संचलन मधुसूदन गव्हाळे व श्यामली जांभळे यांनी केले तर रामभाऊ ताजने यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ नागरिक विचार मंचाचे सर्वश्री राम शेगोकार, पांडुरंग वाडेकर, राम गव्हाळे, जगदेवराव टाले लक्ष्मणराव पदमने, रामभाऊ ताजने, मधुसूदन गव्हाळे प्रभाकर रेवासकर, प्रल्हाद शेकोकार, श्रीकृष्ण शेगोकार, सारंगधर भटकर, निवृत्ती चिम, काशिनाथ भटकर, रामकृष्ण शेगोकार, गणपत शेगोकार, गजानन काकडे, प्रा. गजानन पदमने, राजु चिमणकर, आदी पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव आणि मान्यवरांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.

हा सन्मान सोहळा केवळ डॉक्टरांचा गौरव करणारा नव्हता, तर समाजातील गुणवंत व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला. उपस्थितांच्या मनात अभिमान, प्रेरणा आणि सामाजिक एकतेचा संदेश रुजविणारा हा मोडला अतिसयायाने कार्यक्रमात्ती मांगता याली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *