सर्वसामान्यांना मोठा झटका! पेट्रोल-डिझेलच्या दरात ३ रुपयांची तर CNG मध्ये २ रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील नवे दर

नवी दिल्ली (pragatbharat.com) : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट फटका आता भारतातील सर्वसामान्य वाहनधारकांना बसला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लीटर ३ रुपयांची मोठी वाढ केली आहे. यासोबतच दिल्ली-एनसीआर आणि इतर भागांत सीएनजी (CNG) च्या दरातही प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर:

  • नवी दिल्ली: पेट्रोल ९४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपये, तर डिझेल ८७.६७ रुपयांवरून ९०.६७ रुपये प्रति लीटर झाले आहे.
  • मुंबई: मुंबईत पेट्रोलचा दर १०६.६८ रुपये, तर डिझेलचा दर ९३.१४ रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे.
  • कोलकाता: पेट्रोल १०८.७४ रुपये आणि डिझेल ९५.१३ रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.
  • चेन्नई: चेन्नईमध्ये पेट्रोल १०३.७७ रुपये आणि डिझेल ९५.३५ रुपये प्रति लीटर झाले आहे.

सीएनजी (CNG) देखील महागला: इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर दिल्लीत १ किलो सीएनजीसाठी ७९.०९ रुपये मोजावे लागणार आहेत. तर गाझियाबाद आणि नोएडामध्ये हा दर ८७.७० रुपये आणि गुरुग्राममध्ये 8४.१२ रुपये प्रति किलो झाला आहे.

दरवाढीचे मुख्य कारण: जागतिक स्तरावर ऊर्जा संकट आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता, ज्यामुळे ही दरवाढ करणे भाग पडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या इंधन दरवाढीमुळे येत्या काळात वाहतूक खर्च वाढून सर्वसामान्य वस्तूंच्या किमती वाढण्याची आणि महागाई भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *