सावधान! शरीराचा ‘हा’ अवयव टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाण; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

पुणे (pragatbharat.com) : आपण आपल्या सौंदर्याची आणि आरोग्याची काळजी घेताना अनेकदा चेहरा, हात आणि केसांच्या स्वच्छतेवर भर देतो. मात्र, आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे, जो टॉयलेट सीटपेक्षाही (Toilet Seat) अधिक अस्वच्छ असू शकतो, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्या पायांची नखे हा शरीराचा सर्वात जास्त जंतू असलेला भाग असू शकतो.

टॉयलेट सीटपेक्षा ६० पटीने जास्त जंतू: एका संशोधनानुसार, जर टॉयलेट सीटवर साधारण ५० जंतू आढळले, तर अस्वच्छ नखांमध्ये हीच संख्या ३००० पेक्षा जास्त असू शकते. डॉ. इमरान पटेल यांच्या मते, पाय बहुतेक वेळा बूट आणि मोज्यांमध्ये बंद असल्यामुळे तिथे ओलावा आणि घाम साचतो. हे वातावरण बॅक्टेरिया आणि बुरशीच्या (Fungus) वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते. अनेक लोक नखे कापण्याकडे आणि ती आतून स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे तिथे मृत त्वचा आणि घातक जंतू साचतात.

मुलांच्या आरोग्याला सर्वाधिक धोका: विशेषतः मुलांच्या बाबतीत ही समस्या अधिक गंभीर ठरू शकते. मुले वारंवार आपले हात किंवा पाय तोंडाजवळ नेतात, ज्यामुळे नखांमधील जंतू थेट शरीरात प्रवेश करतात. यामुळे पोटाचे विकार, संसर्ग आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) माहितीनुसार, लांब आणि अस्वच्छ नखे हे संसर्ग पसरवण्याचे मुख्य केंद्र असू शकतात.

कशी घ्यावी काळजी? आरोग्य तज्ज्ञांनी नखांच्या स्वच्छतेसाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. आठवड्यातून किमान एकदा नखे कापावीत. पाय स्वच्छ करताना ते कोमट पाण्यात भिजवून नेल ब्रशच्या साहाय्याने नखांमधील घाण काढावी. आंघोळीनंतर पाय आणि बोटांच्या मधली जागा कोरडी करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून बुरशीचा संसर्ग टाळता येईल. शरीराच्या या छोट्या वाटणाऱ्या भागाकडे केलेले दुर्लक्ष मोठ्या आजारांना निमंत्रण देऊ शकते, त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *