
स्वातंत्र्यलढ्यातील मैलाचा दगड – होम रुल लीग: २८ एप्रिल १९१६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी बेळगाव येथे ‘भारतीय होम रुल लीग’ची स्थापना केली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” ही ऐतिहासिक गर्जना याच चळवळीचा भाग होती. या चळवळीने सामान्य भारतीयांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली.

