
पुणे (pragatbharat.com) : आज ३० एप्रिल २०२६. आजचा दिवस भारतीय इतिहास आणि जागतिक घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणारे धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांची आज जयंती. १८७० मध्ये आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दिला जातो.

