
पंडित मोतीलाल नेहरू जयंती: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि ख्यातनाम कायदेतज्ज्ञ मोतीलाल नेहरू यांचा जन्म ६ मे १८६१ रोजी झाला. त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. भारताच्या संविधानाची पूर्वतयारी मानल्या जाणाऱ्या ‘नेहरू रिपोर्ट’ मध्ये त्यांचे योगदान मोठे आहे.

