रेल्वे भरती २०२६: NTPC आणि ग्रुप-डी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; मे महिन्यात मेगा भरती परीक्षेला सुरुवात

नवी दिल्ली (pragatbharat.com) : रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून (RRB) ८,८६८ पदांसाठी होणाऱ्या NTPC (Non-Technical Popular Categories) परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. पदवीपूर्व (Undergraduate) पदांसाठीची सीबीटी-१ (CBT-1) परीक्षा ७ मे २०२६ पासून सुरू होणार असून ती २१ जून २०२६ पर्यंत विविध टप्प्यांत पार पडेल.

याशिवाय, रेल्वेतील ग्रुप-डी (Group D) च्या २२,००० पदांसाठीची प्रक्रिया देखील गती घेत असून, ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यांच्या परीक्षांचे नियोजन पूर्ण झाले आहे. रेल्वेतील या मेगा भरतीमुळे देशभरातील लाखो उमेदवारांचे लक्ष आता प्रवेशपत्राकडे लागले आहे. उमेदवारांना त्यांच्या प्रादेशिक रेल्वे बोर्डाच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *