
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी राज्य सरकारने मोठी खूशखबर दिली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ अंतर्गत राज्यभरात तब्बल १८,३३१ रिक्त पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलीस बल (SRPP) मधील पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी १८ ते २८ वर्षे असून, मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार शिथिलता देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ३१ मे २०२६ पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यांत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना या भरतीचा मोठा फायदा होणार असून, पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन गृह विभागाने दिले आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती घ्यावी आणि तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

