पुणे मेट्रो लाईन क्र. ३ अंतर्गत वाकड परिसरात प्रस्तावित असलेल्या मेट्रो स्थानकास “भुजबळ चौक मेट्रो स्टेशन” असे नामकरण करण्यात यावे, या मागणीसंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी (भा.प्र.से.) यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

वाकड परिसरातील भुजबळ चौक हे स्थानिक ओळख आणि सामाजिक संदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे प्रस्तावित मेट्रो स्थानकास “भुजबळ चौक मेट्रो स्टेशन” असे नाव दिल्यास वाकड परिसराची स्थानिक ओळख अधिक अधोरेखित होण्यास मदत होईल. या मागणीचा प्रशासनाने सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच वाकड परिसरातील प्रस्तावित डी.पी. रस्ते व शिवरस्त्यांच्या विकासकामांना गती देणे, वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, याबाबतही प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
वाकड परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्थानिक विकास आणि नागरिकांच्या सार्वजनिक सुविधांशी संबंधित प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रशासनाच्या समन्वयाने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
यावेळी पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष श्री. राम वाकडकर, नगरसेविका सौ. श्रुती वाकडकर, नगरसेविका सौ. रेश्मा भुजबळ, नगरसेवक श्री. कुणाल वाव्हळकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद चौधरी उपस्थित होते.

