पिंपरी (Pragatbharat.com):- भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागांतील युवक मोठ्या प्रमाणावर संघटनेशी जोडले जात असून, युवा मोर्चाच्या कार्याला नवे बळ मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर उमाकांत लिंगाडे, श्रीधर महाले आणि प्रज्वल खुटाळ यांच्या नेतृत्वाखाली असंख्य युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चात जाहीर प्रवेश केला. यावेळी युवकांनी सामाजिक कार्य, जनसेवा तसेच युवकांच्या हिताशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

अध्यक्ष दिनेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी विविध उपक्रम, शिबिरे आणि जनसंपर्क कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांच्या समस्या व अपेक्षांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना समाजकार्यात सहभागी करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
या प्रवेश सोहळ्याला युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव तथा प्रभारी अजित कुलथे, सरचिटणीस राहुल खाडे, सुमित घाटे, सम्यक साबळे, राजेश डोंगरे, उपाध्यक्ष मयूर काळभोर, अतुल काळोखे, सचिव गोपाल मंडल, निखिल शहाणे, जालिंदर काटे, रोहित कराळे, शिवाजी कारगुडे, मंडल अध्यक्ष ऋषिकेश भालेकर, आकाश पवार, विद्यार्थी विभाग शहर सहसंयोजक साईराज भालेकर, रोजगार व स्वयंरोजगार शहर संयोजक नितीन साळी, महिला संयोजिका योगिता जाधव, उद्योग आघाडी शहर संयोजक आदित्य कुलकर्णी तसेच सहसंयोजक दीपराज गुप्ता यांच्यासह युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
युवकांचा वाढता सहभाग हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या संघटनात्मक विस्तारासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी काळातही शहरातील अधिकाधिक युवकांना संघटनेशी जोडून सामाजिक व जनहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

