- आळंदीतील अकॅडमीच्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला.. सर्व मृतदेह सापडले…
- पिंपरी-चिंचवड (दि. ०3 ऑक्टोबर २०२६/pragatbharat.com) :- दिवेआगर श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या आळंदी, जिल्हा पुणे येथील विनार्स अकॅडमीच्या ११वी-१२वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अकॅडमीचे सुमारे ३० ते ४० विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर बचावकार्य राबविण्यात आले असून सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत. मृत विद्यार्थ्यांची नावे यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वाहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे अशी आहेत.
घटनास्थळी पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असून मृतदेहांबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. घटनेमुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

